अमळनेर:- शहरातील झामी चौकातील नगरपरिषद मालकीचा जलकुंभ (मोठी पाण्याची टाकी) काल सायंकाळी जमीनदोस्त करण्यात आली.
सदर टाकी जीर्ण होऊन तिची पडझड झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्यात पाणी पुरवठा बंद करून या भागात बायपास पाणीपुरवठा करण्यात येत होता. अखेर काल सायंकाळी ही टाकी यंत्रणेच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.सदर जलकुंभ अनेक वर्षांपासून असल्याने झामी चौक परिसरासाठी ती ओळख ठरली होती.