अमळनेर:- “मुलगा वंशाचा दिवा असतो तर मुली ह्या दोन कुळाच्या उद्धार करतात. त्यांना उच्च शिक्षित केल्याने मुलींच्या वडिलांचा व सासरचा या दोघे कुळाचा उद्धार होतो, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र शिंपी यांनी डॉ. दीक्षा महाजन यांच्या सत्कार प्रसंगी केले.
जिल्हा परिषद शिक्षक दयानंद महाजन यांची कन्या डॉ. दीक्षा महाजन ह्या बी. ए. एम. एस. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल दुनियादारी ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र शिंपी होते. डॉ. दीक्षा महाजन व त्यांचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला. व्ही.आर. पाटील, मुकेश पाटील, गोकुळ पाटील, सुधाकर पाटील, श्यामकांत पाटील, पी. व्ही. निकम, प्रा. डॉ. विलास पाटील, अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. दीक्षा महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांनी सत्काराला उत्तर सांगितले की, सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे द्वार खुले केल्याने आज माझ्यासारख्या स्रिया उच्च शिक्षण घेऊन सन्मान मिळवत आहे. भविष्यात मी ही सर्व सामान्य महिलांना उपचारासाठी नक्कीच सहकार्य करेल, असेही यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाला जिजाबराव माळी,गुलाब शिरसाठ, संजय बागुल,आर टी बागुल,आर बी पाटील,विठ्ठल पाटील, समाधान पाटील,संजय पाटील,शंकरराव बोरसे, कैलास सोनवणे,प्रवीण महाजन,आर एल माळी,डी एस पाटील,विजय माळी, जगतराव पाटील,रोहिदास देसले, समाधान खैरनार,गजानन माळी,एकनाथ निकुंभ,संदीप पाटील, विजय पाटील,रवींद्र सनेर, ए एन पाटील,काशिनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार दयानंद महाजन यांनी मानले.