
अमळनेर:- शहरातील बंद घराच्या ग्रीलमध्ये अडलेल्या मांजराची अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका करत जीवदान दिले आहे.
६ रोजी साई सिद्धी अपार्टमेंट येथे अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर बंद घराच्या ग्रील मध्ये मांजर अडकली असे बाळासाहेब संदानशिव यांनी दूरध्वनीने अग्निशमन विभागाला कळवले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने सदर ठिकाणी अग्निशमन दल पोहोचून अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे , फारुक शेख, जफर पठाण,आकाश संदानशिव,लखन कंखरे यांनी मांजरीस सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.

