
अमळनेर:- अंगणात खडी टाकण्याच्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉड लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना २३ रोजी दुपारी ३ वाजता सानेनगर भागात घडली.
महिलेने उपचारानंतर उशिरा फिर्याद दिल्याने पाच जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पाबाई जवाहरलाल सोनवणे हिच्या अंगणात शेजारील अन्नपूर्णा बाईने खडी टाकली होती. ही खडी का टाकली म्हणून पुष्पाबाईने तिला विचारले त्याचा राग आल्याने दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णाबाईची मुलगी, महिलेचा पती रघुनाथ बारकू खैरनार रा. तांबेपुरा सानेनगर, बहीण हिराबाई रमेश खैरनार रा.सुरत, तिचा पती रमेश नथु खैरनार रा.सुरत, सीमाचा मेव्हणा विनोद महादू मोरे रा. गांधलीपुरा यांनी पुष्पाबाई ओट्यावर असताना अन्नपूर्णाबाईने हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीवर पोटावर मारहाण केली. बाकीच्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण व केली. पुष्पाबाई पदर पायात अडकून खाली पडली. विनोद याने हातातल्या लाकडी दांडक्याने पाठीवर मारून जीवे मारण्याची धमकी दिली. पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे



