
अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- शहरातील विविध ठिकाणावरून बीएसएनएल कंपनीची ३९५ मिटर लांबीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २५ रोजी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारतीवरील २५ मिटर लांबीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे लाईनमन ठाकरे यांच्या लक्षात आले. तसेच पिंपळे रोडवरील नाल्यावरील ३५ मिटर लांबीची, तसेच नाल्याच्या पुढील भागातून ३०० मिटर लांबीची तांब्याची तार, बाजार परिसरातील ३५ मीटर तार कट करून अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. त्यामुळे उपमंडळ अभियंता यांच्या फिर्यादीवरून सतरा हजार किमतीची एकूण ३९५ मीटर लांबीची तांब्याची तार चोरुन नेल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे को जयंत सपकाळे करीत आहेत.




