
अमळनेर:- तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान असुन तर एका ग्रामपंचायतीसाठी एका प्रभागात मतदान आहे. १३ गावांमध्ये निवडणूक पेट्या रवाना झाल्या आहेत.

निवडणुकीसाठी एकूण ३०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण १४ ग्रामपंचायतीं पैकी दोधवद येथे सर्व जागा व सरपंच पद बिनविरोध झाले आहेत. तर पिंपळे खु येथे फक्त एका प्रभागासाठी मतदान होणार आहे.
१२ सरपंच पदासाठी ३३ उमेदवार रिंगणात असून ८३ सदस्यांसाठी २१६ जण रिंगणात आहेत. एकूण १४ ग्रामपंचायतीतील काही ४६ सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे फक्त ८३ जागांसाठी मतदान होणार आहे. अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व मारवड पोलिस ठाण्याचे सपोनि शितलकुमार नाईक यांनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक गावाला भेट देवून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ८ अधिकारी, ५७ पोलीस अंमलदार, ३० होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत.





