
२ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत दहा आरोपींवर गुन्हे दाखल…
अमळनेर:- अमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील गावठी दारूच्या भटट्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करून २ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत दहा आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
अवैध गावठी हातभट्टी दारुवर कठोर प्रतिबंधक कारवाईचे अभियान अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हाती घेतले असुन काल त्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी व त्यांच्या पथकाने अमळनेर शहरात तसेच जानवे व गडखांब शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी गैरकायदा गावठी हात भट्टीवर छापा टाकुन कारवाई केली आहे.
या कारवाईत दहा आरोपींवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले असुन यात एक लाख पस्तीस हजाराच्या तीन मोटर सायकल, १७ हजार रुपये किमतीची १७७ लिटर गावठी दारु, एक लाख नऊ हजाराची १४६५ लिटर कच्चे रसायन असा दोन लाख बासष्ट हजाराचा मुद्देमाल मिळून आला. नमुने घेवून मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सपोनि हरीदास बोचरे, पोउनि विकास शिरोळे, पोहवा संदेश पाटील, पोहवा सुनिल जाधव, पोहवा विजय भोई, पोहवा कैलास शिंदे, पोहवा हितेश चिंचोरे, पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील, पोना जयंत सपकाळे, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ योगेश बागुल, मपोकॉ नम्रता जरे, मपोकॉ मोनिका पाटील यांच्या पथकाने केली आहे. यापुढे देखील असेच मोठ्या कारवाई करण्याचे अभियान सतत राबविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पो.नि. विजय शिंदे यांनी दिली आहे.




