
संडासाच्या टाकीत बुडून बालकाचा मृत्यू, कावपिंप्री येथील दुर्दैवी घटना…

अमळनेर:- तालुक्यातील कावपिंप्री येथे दोन वर्षांच्या मुलाचा संडासाच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी सायंकाळी ५ वाजेपुर्वी घडली. सदर मुलाच्या वडिलांचा मागील महिन्यातच १७ तारखेला मृत्यू झाला होता.
भूषण दिलीप सोनवणे असे मयत मुलाचे नाव आहे. अशोक सोनवणे यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरू असून संडासाच्या टाक्या उघड्या व पाण्याने भरलेला होत्या. सायंकाळी अचानक भूषण याचे प्रेत टाकीत तरंगताना दिसले.अशोक सोनवणे यांचा फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत. मयत मुलाचे वडील दिलीप लीलाधर सोनवणे हा मोलमजुरी व विद्युत कामे करून त्याचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र लिव्हरच्या कॅन्सरचे निदान झाल्याने मागील महिन्यातच १७ रोजी त्याचे निधन झाले होते. त्यानंतर दोन वर्षीय भूषण याचे निधन झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




