
९ हजारावर मालमत्ता वाढल्याने पालिकेच्या उत्पन्नात पडणार भर…
अमळनेर:- जिओ टॅगिंगसह लेझर गनच्या साहाय्याने मालमत्ता मोजण्याचा खाजगी कंत्राट दिल्यानंतर शहर हद्दीतील मालमत्तांची संख्या वाढलेली आढळून आल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
अमळनेर शहरात २४ हजार मालमत्ता होत्या. नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सर्व मालमत्तांची नव्याने अचूक मोजणीसाठी कोअर प्रोजेक्ट इंजिनियंर अँड कन्सल्टंट या कंपनीला कंत्राट दिले. लेझर गन मोजणीत शहराच्या हद्दीत ३३ हजार मालमत्ता आढळून आल्या. पूर्वी ही संख्या २४ हजारांवर होती. प्रत्येक मालमत्तेला क्रमांक देण्यात आला आहे. जानेवारीपर्यंत सर्वे होणार त्यांनतर डिजिटल नकाशे आणि संगणकीकरण करण्यात येईल. तदनंतर सर्व मालमत्ता धारकांना ११९ ची नोटीस देण्यात येऊन हरकती मागवण्यात येणार आहे. यामुळे मालमत्ता कर कमी जास्त याची तफावत स्पष्ट होईल. हरकतीवर सुनावणी होऊन कुठलीही करवाढ न करता मालमत्ता कर निश्चित केले जाणार आहेत. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.




