अमळनेर:- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे २७ वे अखिल भारतीय साहित्य साहित्य संमेलन, अमळनेर येथे फेब्रुवारी २०२४ च्या २,३,४ या कालावधीत होत आहे. साहित्य संमेलनातील एक अत्यंत लोकप्रिय असणारा कवीकट्टा हा उपक्रम आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातील नवोदित तसेच प्रस्थापित कवींना यामध्ये सहभागी होता येणार आहे.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात कविकट्टा नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङमय मंडळाचे कार्यवाह नरेंद्र निकुंभ होते. तर व्यासपीठावर कवीकट्टाचे प्रमुख संयोजक राजन लाखे (पुणे), मंडळाचे उपाध्यक्ष व कवीकट्टा समन्वयक रमेश पवार होते. बैठकीत कवि कट्टा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. राजन लाखे यांनी हा उपक्रम शिस्तबध्द पध्दतीने कसा यशस्वी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीस म. वा. मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी, विलास पाटील, दिनेश नाईक, भाऊसाहेब देशमुख, रमेश धनगर, डॉ. कुणाल पवार, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनिता पाटील, प्रतिमा पाटील, विवेक जोशी, रत्नाकर पाटील, विजय पाटील, प्रकाश सोनवणे, रामकृष्ण पाटील, पुनम साळुंखे, आदींची उपस्थिती होती. या संमेलनासाठी आलेल्या कवितांपैकी २०० कवितांची निवड करून कवींना निमंत्रित केले जाणार आहे. कवींनी खालील नियमानुसार आपली कविता पाठवावी, असे आवाहन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी केले आहे. कविकट्टासाठी पाठविण्यात येणारी कविता स्वरचित असावी व प्रत्येकी कवीने एकच कविता पाठवावी. कविता २० ओळीपेक्षा जास्त नसावी. निवड समितीने निवडलेली कविता अंतिम असेल. कवीन स्वतःचा पत्ता, दुरध्वनी – भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल पानाच्या वरच्या बाजुला स्पष्ट अक्षरात लिहावा. कविता पोस्टाने पाठवितांना पाकिटावर कविकट्टा असा स्पष्ट उल्लेख असावा. कविता फक्त पोस्टाने अथवा ईमेलद्वारे पाठवावी, व्हॉटसएप वरची कविता स्विकारली जाणार नाही. कविता ईमेलने पाठवितांना युनिकोड फॉन्टमध्येच पाठवावी. कविता कार्यालयात पोहचण्याची अतिम दिनांक २० डिसेंबर २०२३ असेल. ईमेलने कविता पाठविण्यासाठी या ईमेल आयडीवर पाठवावी
KaviKatta97amalner@gmail.com तसेच पोस्टाने कविता पाठविण्याचा पत्ता- मराठी वाङमय मंडळ, नांदेडकर सभागृह, न्युप्लॉट, अमळनेर, जि. जळगांव ४२५४०१ या पत्यावर पाठवाव्यात असे आवाहन आयोजकांनी केले आहे.