१८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत चौघांवर केला गुन्हा दाखल…
अमळनेर:- महसूल व पोलीस पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडले असून ४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर रोजी पो.नि. विजय शिंदे,पो.हे.कॉ.मधुकर पाटील, महसुलचे आबाजी सोनवणे यांच्या पथकाने शहरातील ड्रीम सिटी भागात अवैध वाहतूक करणारे डंपर क्रमांक (एमएच १९ एम ७८५७ ) मध्ये ३६०० रुपये किमतीचे गौण खनिज,३६००० रुपये किमतीची दुचाकी,१८ लाख किमतीचे डंपर असे एकूण जवळपास साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बनावट पावत्या देखील संशयितांकडून जमा करण्यात आल्या असून विक्की जाधव, विशाल जाधव, विक्की ललवाणी,आदेश पाटील या ४ जणांवर भादवि कलम ३७९, ४२०,३४ म अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करत आहेत.