
उसनवारीचे पैसे मागण्यावरून झाला वाद, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- उसनवारीचे पैसे मागण्यावरून एकाच्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना ३० रोजी रात्री १० वाजता घडली.
शेख अख्तर शेख सलीम रा दर्गाअली मोहल्ला (गांधलीपुरा) याचे मेव्हणे समद शेख याने शाहरुख खान रहीम खान याच्याकडून ७० हजार रुपये उसनवारी घेतले होते. शाहरुखने हे पैसे मागणीसाठी १९ रोजी रात्री १२ वाजता अख्तरचे वडील व मेव्हणे याना शिवीगाळ केली. त्यांनी पैसे दिले होते म्हणून याबाबत पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. त्याचा राग येऊन शाहरुखने ३० रोजी पाच कंदिल चौकात अख्तर याला अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्याद दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.




