अमळनेर:- तालुक्यातील इंदापिंप्री येथील चेतन जगदीश पाटील (वय २६) या तरुणाने ६ रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शिरुड शिवारात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शिरुड शिवारात शेतातील आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन या तरुणाने जीवनयात्रा संपविली आहे. पोलीस पाटील भानूदास पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. दरम्यान चेतन पाटील यांच्या पश्चात विधवा आई आहे. त्याच्यावर कर्ज झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.