
अमळनेर:- शहरातील बोरी नदी पुलाखाली अर्भक सापडल्याने मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
७ रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान शहरातील बोरी नदीवरील पुलाखाली पुरुष जातीचे २ ते ३ दिवसांपूर्वी जन्मलेले मृत अर्भक मिळून आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच अज्ञाताविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.




