अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील मोहिनी भारत गॅस एजन्सी कडून काल उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच कुसुमबाई भास्कर पाटिल व मोहिनी गॅसचे मालक शाम संदानशिव उपस्थित होते.
या कार्यक्रमात मांडळ,मुडी, कळंबु गावातील १४ गरीब कुटुंबांना उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. यामुळे या कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल गॅसचा वापर करता येणार आहे. यावेळी सरपंच कुसुमबाई पाटील यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेची प्रशंसा करत या योजनेमुळे गरीब कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी गॅसच्या वापराचा लाभ मिळणार आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. सदर लाभार्थी महिलांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी केंद्र सरकारचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे आमचे जीवनमान उंचावणार आहे. यावेळी मोहिनी गॅस चे संचालक श्याम संदानशिव,भास्कर पाटील, सचिन कोळी,मंगेश कांडेलकर राहुल संदानशिव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.