अमळनेर:- तालुक्यातील कोंढावळ येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना दिनांक १४ रोजी घडली आहे.
तालुक्यातील कोंढावळ येथील सुरेश अजबराव पाटील (वय ५१) यांनी त्यांच्या शेतात विहिरीजवळ विषारी औषध प्राशन केल्याचे आढळून आले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना उचलून खाजगी वाहनातून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सफौ संजय पाटील हे करीत आहेत.