
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा येथे तलाठ्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडत मारवड पोलिसांत जमा केले आहे.
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार तलाठी पथक गस्त घालत असताना दिनांक १६ रोजी रात्री १० वाजता बोहरा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आल्याने ते मारवड पोलिसांत जमा करण्यात आले असून १८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या पथकात मंडळ अधिकारी विठ्ठल पाटील, मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ, तलाठी ए बी सोनवणे, पराग पाटील, तिलेश पवार, प्रदीप भदाणे, मनोहर भावसार व सचिन बमनाथ यांचा समावेश होता.




