तालुक्यातील समाज बांधवांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन…
अमळनेर:- अखिल भारतीय मराठा महासंघाची शिक्षण, नोकरी, रोजगार मेळावा आणि पदाधिकारी निवड बैठक ३० रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, आर्थिक मागास महमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मंगेश निकम, अमोल निकम उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध, शिक्षणासाठी कर्ज, नोकऱ्या, शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी या मेळाव्यास हजर राहावे असे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.