
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा अज्ञात कारणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली असून २ रोजी दुपारी शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील धार येथील शरद पाटील हे सकाळी दहा वाजता त्यांच्या मालकीच्या शेतात त्यांचे आतेभाऊ सुरेश जगन पाटील (वय ४५) यांना पाणी भरण्याच्या कामासाठी घेवून गेले. सुरेश यास काम लावून शरद पाटील हे त्यांच्या कामानिमित्त बोरगाव येथे निघून गेले. दुपारी ४:३० वाजता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शरद पाटील यांना फोन करून सुरेश हा जमिनीवर पडल्याचे सांगितल्याने त्यांनी शेतात येवून पाहिले असता सुरेश हा जमिनीवर पालथा पडलेला होता व काहीच हालचाल करत नसल्याने खाजगी वाहनात टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सुरेश यास मृत घोषित केले. शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना मुकेश साळुंखे करीत आहेत.




