
केंद्राच्या कायद्याविरोधात काढला सर्व संघटनांनी काढला मोर्चा…
अमळनेर:- केंद्र शासनाचा नागरिक सुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काल अमळनेर टॅक्सी युनियनसह इतर वाहनचालक व मालकांच्या विविध संघटनांनी स्टेरिंग छोडोचा नारा देत एक दिवस बंद पाळत या कायद्याचा निषेध नोंदविला.
दिवसभर टॅक्सी स्टँड परिसरात निदर्शने व घोषणा दिल्यानंतर दुपारून तिरंगा चौकातून मोर्चा काढून प्रांत कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.यानंतर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार यांनी स्वीकारले.या बंद मध्ये अमळनेर टॅक्सी युनियन, सदगुरु जीप टॅक्सी युनियन, चोपडा टॅक्सी युनियन, शिरपूर टॅक्सी युनियन,सर्व खाजगी मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीच्या गाडीवरील चालक व मालक,लक्झरी चालक व मालक, क्रुझर तसेच खाजगी वाहनांचे मालक व चालक, अमळनेर ट्रक मालक व चालक युनियन,अमळनेर ट्रान्सपोर्टचे सर्व मालक व चालक यासह अनेक जण सहभागी झाले होते.सदर बंद मुळे प्रवासी व व्यापारी बांधवांची गैरसोय झाली.
सदर निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाचा निषेध म्हणून आम्ही अमळनेर तालुक्यातील सर्व टॅक्सी युनियन चालक व मालक तसेच इतरत्र खाजगी वाहन चालक व मालक “स्टेरिंग छोडो” या पद्धतीचे आंदोलन केले असून केंद्र शासनाने केलेल्या कायद्याची तरतूद म्हणजे केंद्र शासनाचा नागरिक सुरक्षा कायदा हा कायदा वाहन चालकांसाठी अतिशय कठीण कायदा आहे, त्या कायद्याचा निषेध म्हणून आम्ही मोर्चाचे आयोजन केले असून सदर कायदा तातडीने रद्द करावा अशी मागणी यात करण्यात आली आहे. सदर निवेदनावर सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.




