
पीडित शेतकऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यात २०१८ ते २०२३ दरम्यान झालेल्या शेडनेट घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून योग्य ती कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अमळनेर,पारोळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची सरकारच्या अनुदानित शेडनेट तसेच पॉलिहाऊस संदर्भात फसवणूक झाल्याचे प्रकरण तालुक्यात चांगलेच तापले आहे.याप्रकरणी अशोक पाटील, समाधान शेलार,उद्धव कुवर, सचिन पाटील, तसेच शेडनेट बनविणाऱ्या कंपन्यांचे मालक, कृषी खात्यातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने अफरातफर करून शासनाची व पीडित शेतकऱ्यांची लयलूट झाल्याबद्दल शासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आली आहे.
संशयितांची योग्य ती चौकशी तसेच कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून न्याय न मिळाल्यास २६ जानेवारी पासून न्याय मिळेपर्यंत जमिनीत खड्डा करून गाडून घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कृ.उ.बा.समितीचे संचालक सचिन बाळू पाटील, उबाठा गटाचे उपशहर प्रमुख अनंत निकम,यांच्यासोबत कैलास दगा पाटील,नारायण रघुनाथ पाटील,ईश्वर उखुर्डु पाटील,दिनेश दगा पाटील,राजेश उमाकांत पाटील, ज्ञानेश्वर धनराज पाटील, सुरेश पुंडलिक पाटील,अरुण आत्माराम भागवत,दिपक नामदेव पाटील, कन्हैयालाल झिपरू पाटील, बाळू गैभू पाटील,विक्रम बुधा पाटील आदी पीडित शेतकरी उपस्थित होते.




