
अमळनेर:- तालुक्यातील निसर्डी येथील जि.प. प्राथमिक शाळेत येथे दिनांक १० जानेवारी बुधवार रोजी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन सरपंच वैशाली प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात लहान बालकांनी विविध प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी आणले होते. माता, पालक व ग्रामस्थांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांकडून पदार्थ विकत घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या बाल आनंद मेळाव्यात पदार्थ विक्री बरोबर विविध उपक्रम घेण्यात आले त्यात एक मिनिट स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लकी ड्रॉ इत्यादी उपक्रम समावेश होता .त्यात महिला, पुरुष व युवकांसाठी स्वतंत्र उपक्रम घेण्यात आले.
त्यात यशस्वी सहभागींना बक्षीस भेटवस्तू शिक्षकवृंदाकडून देण्यात आले. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक भरत जाधव व सहकारी भागवत मोरे यांनी प्रभावी नियोजन करून यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व केंद्रप्रमुख आर एल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी उपसरपंच कपूरचंद पाटील, माजी सरपंच भिका पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, रावसाहेब पाटील, लोटन पाटील, दिपक पाटील, शांतीलाल पाटील, कन्हैयालाल पाटील, योगेश पाटील, हिरालाल पाटील, सचिन पाटील, विलास मोरे, गुलाब पाटील आदींनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला.




