
अमळनेर:- तालुक्यातील सुंदरपट्टी येथील ५५ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल रोजी घडली आहे.

रतीलाल सखाराम पाटील (वय ५५) याने २३ रोजी दुपारी साडे तीन वाजेपुर्वी स्वतःच्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला सुती दोर बांधून गळफास घेतला. गणेश पाटील, गोकुळ पाटील, प्रेमराज पाटील, संजय पाटील यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




