
स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी राबविला उपक्रम…
अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी वर्ष भरात विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात आले. त्याअंतर्गत ज्या महिला घरी शिवणकाम करतात त्यांच्याकरिता ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
१२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बचत गटातील ६७ गरजू महिलांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना विविध प्रकारचे डिझाईन ब्लाऊज, वधू मुलीचे आकर्षक ब्लाऊज, फॅन्सी ड्रेस असे विविध प्रकार शिकवण्यात आले. ज्याचा महिलांना खूप उपयोग झाला. या प्रशिक्षण, कार्यक्रम सांगता प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून माजी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना उद्योग व्यवसाय विषयी महत्व पूर्ण माहिती देत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे तालुका सन्वयक सिमा रगडे यांनी बचत गटातील महिलांनी आपल्या गरजा नुसार प्रशिक्षण घेऊन नवीन नवीन उद्योजक व्यवसाय सुरू करावा यावर मार्गदर्शन केले, ज्योती भावसार यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करावे व कुटुंबाला आधार साठी आपले कार्य करावे यावर माहिती दिली. डॉ. भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महिलांसोबत चर्चा केली. तसेच श्रीमती रेणू प्रसाद यांनी महिलांशी संवाद साधून नवीन डिझाईनचे बनवलेले ब्लाऊज व ड्रेस यांची पाहणी केली. सदर शिवण क्लास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून फॅशन डिझायनर चैताली साळुंखे या उपस्थीत होत्या. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आधार संस्थेचे प्रकल्प समन्वयक मुरलीधर बिरारी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा पाटील, निशिगंधा पाटील, तेजस पाटकरी यांनी परिश्रम घेतले.




