
अमळनेर:- अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून अमळनेर परतणाऱ्या महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे अमळनेरात जंगी स्वागत करण्यात आले.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अमळनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथून हंसानंद महाराज अयोध्या येथे गेले होते.जळगाव जिल्ह्यातून स्वामी हंसानंद तीर्थ जी महाराज अखिल भारतीय संत समितीच्या निर्देशक मंडळाचे सदस्य आहेत. महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज यांचे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान विकासासाठी मोठे योगदान आहे.त्यांचे गोरखपुर बांद्रा एक्सप्रेसने अमळनेर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. त्यावेळी अमळनेर रेल्वेस्टेशनवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी श्री कपिलेश्वर मंदिर संस्थांचे उपाध्यक्ष सी.एस.पाटील, स्वामी देवेश्वर तीर्थ महाराज, सचिव मगन पाटील,ज्येष्ठ विश्वस्त घनश्याम अग्रवाल,विश्वस्त ऍड.राजेंद्र बी.चौधरी, ऍड. संभाजी पाटील,अतुल चौधरी, दिनेश पालवे,प्रा.डी.आर. चौधरी, भागवत अण्णा, माधव देवधर,श्रावण तेले व तालुक्यातील असंख्य भाविकांनी महाराजांचं स्वागत केले. यावेळी रेल्वे प्रशासनाचे सहकार्य लाभले. संपूर्ण अमळनेर रेल्वे स्टेशनवर जय श्रीरामचा जयघोष करण्यात येत होता.




