
तहसीलदारांना निवेदन देत समाजोपयोगी उपक्रम सुरू करण्याची मागणी…
अमळनेर:- पर्यावरण विकास संस्थेने मोफत शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी शहरात रॅली काढत तहसीलदारांना निवेदन देत समाजोपयोगी कार्यक्रम लागू करण्याची मागणी केली आहे.
पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक गोरक्षनाथ गवते, प्रदेशाध्यक्ष शरद जावळे, राष्ट्रीय कार्य. अधिकारी गोरख बढे, जिल्हाध्यक्ष गिरीश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अंकित पाटील, सचिव विजय चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक दिवसीय शिबीर २३ रोजी शहरातील तेली भवन येथे पार पडले. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुभाष चौकात पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. विविध पर्यावरण विषयक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना प्रमुख पदाधिकारी यांनी निवेदन दिले. यात प्रामुख्याने मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा पुरवण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.




