
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथील प्रफुल्ल पाटील यांची नुकतीच रा. काँ. अजित पवार गटाच्या तालुका चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
तालुक्याचे आमदार व मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. एकलहरे येथील प्रफुल्ल सीताराम पाटील हे कै. विनायक सिताराम पाटील यांचे लहान बंधू असून ते सध्या नैसर्गिक मानव अधिकार फोरम गवर्मेंट ऑफ इंडिया संस्थेत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून तसेच एकलहरे विविध कार्यकारी सोसायटी संचालक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




