
स्टेशन रोड भागातील मारहाणप्रकरणी दुसऱ्या गटातर्फे तक्रार दाखल…
अमळनेर:- शहरातील स्टेशन रोड वर लहान मुलांच्या भांडणावरून पाच जणांनी लोखंडी हत्याराने तिघांवर वार करत जखमी केल्याची घटना १७ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन सातपुते यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, १७ रोजी सायंकाळी सात वाजता मुलाचा भांडणावरून वाद झाला होता.व त्यात समजोता करून वाद मिटवला होता.मात्र रात्री ९ वाजेच्या सुमारास स्टेशन रोड वर लहान भाऊ अनिल सातपुते, मुलगा पंकज सातपुते,पुतण्या कल्पेश सातपुते व चुलत पुतण्या दीपक चौगुले आदी गप्पा मारीत बसलेले असतांना चार पाच जण हातात लोखंडी हत्यार घेवून भाऊ व पुतण्यास शिवीगाळ करीत तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत योगेश राजपूत याने हातातील गुप्तीने कल्पेश सातपुते यास पोटावर वार केले.सुमित राजपूत याने हातातील चाकूने पंकज सातपुते याच्या मानेवर व उजव्या हातावर चाकूने वार केले. मुकेश परदेशी याने फायटरने अनिल सातपुते याच्या डोक्यावर वार केला तर राजेश परदेशी याने लोखंडी सळईने हातापायावर वार करून जखमी केल्याची घटना १७ रोजी घडली असून याबाबत अमळनेर पोलिसांत भादवी कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४,५०६ नुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहेत.




