
आठ जणांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे किरकोळ कारणावरून महिलेसह तिच्या मुलाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

धार येथील रहिवासी असलेले फिर्यादी सुनील शालिग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी अनिता सुनील पाटील ह्या पुरुषोत्तम सखाराम पाटील यांच्याकडे काम करणाऱ्या मिस्तरी यांना येण्या जाण्यासाठी रस्ता सोडून बाजूला सिमेंट रेतीचा माल कालवा, असे सांगितले. मात्र हे बोलण्याचा राग आल्याने शशिकांत सखाराम पाटील, पुरुषोत्तम पाटील, दिनेश पाटील, गणेश पाटील, सखाराम पाटील, सुरेखा पाटील, वैशाली पाटील, कल्पना पाटील यांनी लोखंडी रॉडने, लाकडी काठीने अनिताबाई हिला हातापायाला व डोक्याला मारहाण केली तसेच शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी फिर्यादीचा मुलगा दिव्येश याला मारले. या मारहाणीत अनिता बाईच्या सोन्याची मंगळपोत तुटून नुकसान झाले. याप्रकरणी मारवड पोलिसांत भादवि कलम ३२६, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.




