अमळनेर :- तालुक्यातील ० ते ५ वयोगटातील सुमारे २४ हजार ५९४ बालकांना दि.३ मार्च रोजी लसीकरण करण्यात आले. सकाळी मंत्री अनिल पाटील यांनी बालकाला पोलिओ डोस देऊन लसीकरणाचा शुभारंभ केला.
तालुक्यातील प्रत्येक गावात दि.३ रोजी प्लस पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यात ग्रामीण भागात १४ हजार २४६ बालकांपैकी १३ हजार ३३३ बालकांना लसीकरण करण्यात आले.तर शहरी भागात १२ हजार ९६२ बालकांपैकी ११ हजार २६१ बालकांना लसीकरण करण्यात आले असून अमळनेर तालुक्यातील ९३.५० टक्के बालकांना आज लसीकरण करण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, पालिका रुग्णालयाचे डॉ. नेरकर, डॉ.विलास महाजन, येवले व आरोग्य पर्यवेक्षक किशोर माळी, एल टी पाटील आदी उपस्थित होते.