
अमळनेर:- शहरातील पुज्य सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्थेत स्वीकृत संचालक म्हणून संजय कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच मासिक मिटिंगमध्ये सहकार गटाने संजय पाटील यांची स्वीकृत संचालक म्हणून निवड केली त्यांच्या या निवडीचे सत्ताधारी व विरोधी संचालकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निवडणुकीत संजय पाटील यांचा अल्पशा मताने पराभव झाला होता. सहकार गटाने त्यांचे पुनर्वसन केले आहे,स्वीकृत संचालक संजय पाटील यांचे पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश चव्हाण, उपाध्यक्ष महेश नेरपगार,प्रा मंदाकिनी भामरे,सुशील भदाणे, संजीव पाटील,सविता बोरसे, सहकार पॅनल प्रमुख तुषार बोरसे,आर बी पाटील,जितेंद्र ठाकूर,बी बी चव्हाण,महेंद्र रामोशे,जे डी अहिरे,दीपक पाटील, सुभाष सोनवणे,भूषण सोनवणे ,मुकेश पाटील,श्रीनाथ पाटील,कुंदन पाटील,महेंद्र बोरसे आणि पतसंस्थेचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.




