
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र.डांगरी तसेच मारवड येथील गावठी दारू अड्ड्यावर मारवड पोलिसांनी धाड टाकली असून एकूण ४ हजार ४०० रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आला असून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथील भय्या बाबूलाल भिल हा वावडे ते मुडी प्र.दगडी रस्त्यावरील नाल्याशेजारी गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पीएसआय विनोद पाटील, पोहेकॉ भरत ईशी,सुनील तेलीतुषार वाघ यांनी धाड टाकली असता त्याच्याकडे असलेले प्लास्टिक कॅन, तगारी, नवसागर रसायन असे एकूण ३ हजार २०० रुपयांची गावठी दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले असून दारूबंदी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत मारवड येथील कृष्णा नारायण चव्हाण(वय-४५) हा मारवड जवळील माळण नदीच्या काठावर गावठी दारूची विक्री करत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली.पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता त्याच्याकडील १२०० रुपये किंमतीची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.




