अमळनेर : शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना धोकेदायक ठरणारे विद्युत तारा आणि झाडाच्या फांद्या अखेर हटवण्यात आल्या आहेत.
प्रभाग चार मधील कोष्टीवाडा परिसरात विद्युत तारांमध्ये झाडाच्या फांद्या अडकल्याने झाड पडण्याची भीती होती तसेच त्याठिकाणी लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या जीवाला धोका होता.याबाबत परेश उदेवाल आणि नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. वीज वितरण चे अभियंता हेमंत सैंदाणे यांनी धोकेदायक फांद्या आणि तारा काढून सुरक्षित केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. नागरिकांच्या अडचणी दूर झाल्याने त्यांनी वीज मंडळाचे आभार मानले आहे.