
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे १ जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्ताने व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आईच्या नावानं एक झाड’ या आवाहनाला प्रतिसाद देत मिशन ग्रीन पिंपळे उपक्रम सुरु करण्यात आला.

येथील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, सर्व सदस्य, कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक संजय भोसले, शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी, जि प.प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक राजू पाटील, शिक्षक वृंद व गावातील भूमिपुत्रांनी एकत्र येत गावातील लोकांच्या मार्गदर्शनाखाली भुजल अभियान वृक्ष दिंडी उपक्रमांतर्गत जल व पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून या उपक्रमास सुरूवात झाली. या माध्यमातून गाव दरवाजा, श्री गुरुदेव दत्त मंदिर, जि.प. शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाना, पाझर तलावाजवळ, बसस्टॉप, माळण नदीच्या काठावरती परिसरात आईचे-वडिलाचे झाड, लेकीचे झाड, बहिणीचे झाडं लावण्यात आलीत. यासाठी पिंपळे येथील भूमिपुत्र जे नोकरीनिमित्त गावापासून दूर राहतात पण गावाशी नाळ जुळलेली आहे असे तरूण तसेच गावातील पर्यावरण प्रेमींनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन गाव सुंदर व हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये वृक्षमित्र पोलीस हवालदार मुंबई राजेंद्र दिलीप चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष निंबा दला चौधरी, जयवंतराव दगा पाटील, संतोष बापू चौधरी, गोकुळ चुडामन पाटील,सुधाम बळीराम पाटील, अरुण संभाजी पाटील,सुरेश बनगर पाटील,विजय साहेबराव पाटील,लोटन जगन पाटील,आबा पोपट पाटील,गोविदा काशिनाथ चौधरी, ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील व सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला होता.





