
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथून अमळनेर शहरात खरेदीसाठी आलेली महिला मुलासह बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी अमळनेर पोलिसांत दिली आहे.
तालुक्यातील कळमसरे येथील अशोक वसंत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी रोशनी अशोक महाजन व नातू श्रेयांक हे ६ रोजी अमळनेर शहरात कपडे खरेदीला आले होते. दुपारी १२:३० वाजता रोशनी हिने मुलाला सोबत घेवून परकरला शिलाई मारून येते असे सांगत आईला एका दुकानात थांबवून ठेवून निघाली. मात्र बराच वेळ झाल्याने ते दोघे परत न आल्याने बाजारपेठ व शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मुलगी रोशनी व नातू श्रेयांक यांचा कोणताच तपास न लागल्याने अमळनेर पोलीसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास हेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहेत.




