
मारवड ता. अमळनेर येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबविण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्ष संवर्धन काळाची गरज या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून वृक्षारोपण केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्हि.डी .पाटील यांनी वृक्षारोपणाबरोबरच आपल्या परिसरात एकही झाड तोडू देणार नाही याबाबत उपस्थितांना प्रतिज्ञा दिली.महाविद्यालयाच्या परिसरात कडूनिंब, पिंपळ ,वड,बेल अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापकांनी एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना नवनियुक्त कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. नंदा कंधारे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा.डॉ.दिलीप कदम, प्रा. डॉ.पवन पाटील,प्रा. विजय पाटील, प्रा. डॉ.संजय पाटील, प्रा. डॉ.माधव वाघमारे, प्रा.डॉ. संजय महाजन आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. शाम पाटील व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.




