
अमळनेर :- इमारतीच्या तिसरा मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास आर के नगर परिसरात घडली. शाहिद सादिक शेख (वय २४) हा आर के नगर येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तो आजारी असल्याने घरी आराम करत होता मात्र कामावर गेलेल्या मोठा भाऊ शाकीर साठी पाण्याची बाटली देण्यासाठी तो कामावर गेला होता.मात्र आपल्या भावाला कामात मदत करण्यासाठी तोही कामाला लागला आणि काही वेळातच हा भीषण अपघात झाला. शुक्रवारी कुटुंबीय त्याच्या साठी मुलगी पाहण्यासाठी गेले होते, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असून रात्रीच त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला नातेवाईक याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.




