
अमळनेर:- शहरातील श्री गणेश आय हॉस्पिटल, लायन्स क्लब आणि लिनेस क्लब ऑफ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जुने मधुमेह रुग्णांसाठी शुगर आणि नेत्र रोग चिकीत्सा शिबिराचे आयोजन रविवार 21 जुलै रोजी करण्यात आले आहे.
यात मधुमेह रुग्णांची मोफत शुगर आणि नेत्रपटल (रेटिना) तपासणी केली जाणार आहेतरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश आय हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे नाव नोंदणी साठी रुग्णांनी श्री गणेश हॉस्पिटल, डॉ. अविनाश जोशी, जोशी हॉस्पिटल, डॉ. दिनेश महाजन, मोरया हॉस्पिटल, मानसी मेडिकल, आणि विजय मेडिकल, येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे




