
अमळनेर : येथिल प्रताप कॉलेज मधिल पूज्य साने गुरुजी सभागृहात २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या मुलाखतीकरिता संवाद कौशल्य कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी केले.
प्रस्तुत कार्यशाळा ही पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणा-या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे.एक आठवडा चालणा-या या कार्यशाळेत ईंग्रजी विषयातील तज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मागरदर्शन करणार आहेत. प्रस्तुत कार्यशाळेच्या उदघाटन सत्राचे अध्यक्ष उप प्राचार्य डॉ.विजय तुंटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उप प्राचार्य डॉ.अमित पाटील व डॉ.भरतसिंग पाटील यांची विशेष उपस्थित होती.आपल्या उदघाटनपर भाषणात प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा दिले.या वेळी प्रा.नितीन पाटील यांनी कार्यशाळा घेण्या मागची आपली वैचारिक भूमिका स्पष्ट करताना संस्कृत भाषेत विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य कसे जपावे तसेच महत्वाचे गुण कसे अंगीकृत करावे या संबंधीची माहिती विद्यार्थ्यांना दिली.या प्रसंगी कार्यशाळेचे बहुविध महत्व डॉ.जितेंद्र पाटील यांनी विशद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.विजय तुंटे यांनी करिअरसाठी संवाद साधणे महत्वाचे असून त्या करिता अशा संवाद कौशल्य कार्यशाळेची उपयुक्तता आहे,नेतृत्व करताना प्रभावाचे एक साधन म्हणजे संवाद होय या करिता भाषा अवगत करा असे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ईंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.धिरज वैष्णव, डॉ.निलेश चित्ते,डॉ.हेमंत पवार,रागिणी सैंदाणे ,भोजराज पाटील यांच्यासह विभागातील प्रा.नितीन पाटील,डॉ.जितेंद्र पाटील परिश्रम घेत आहेत. प्रस्तुत कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सह प्रा.वृषाली वाकडे,प्रा.भाग्यश्री जाधव,डॉ.वंदना भामरे,प्रा.नितेश कोचे,डॉ.सुनिल राजपूत हे उपस्थित होते.या कार्यशाळेच्या उदघाटन सत्राचे सूत्र संचालन डॉ.निलेश चित्ते यांनी केले.




