
अमळनेर:- एज्यूमिट अकॅडमी, महाराष्ट्र यांच्यामार्फत भारत टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मारवड येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
पूर्व शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर व पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी कु. कृतीका भटू पाटील (द्वितीय क्रमांक- २ री), दिव्यांनी समाधान शिंदे (तृतीय क्रमांक-२ री) – माहेश्वरी रवींद्र साळुंखे (प्रथम क्रमांक- ४थी), रोशनी किरण शिंदे (द्वितीय क्रमांक- ४थी) या विद्यार्थ्यांचा पुणे येथील राष्ट्रसेवादल पर्वती पायथा येथे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. सदर सदर परीक्षेला एकूण 14 विद्यार्थी बसविण्यात आहे. सदर परीक्षा इयत्ता पहिली ते आठवी च्या वर्गांपर्यंत होती. मराठी गणित व परिसर अभ्यास या विषयावर आधारित होती.सदर परीक्षा दीडशे गुणांची होती. सदर परीक्षेत राज्यस्तर, जिल्हास्तर व केंद्र स्तर याप्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येते. राज्यस्तर प्राप्त विद्यार्थ्यांना इस्त्रो, विधान भवन, विधान परिषद, सायन्स पार्क इत्यादी ठिकाणी भेटीसाठी निवड केली जाते.परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमती शारदा संतोष जाधव, श्रीमती मनीषा सुरेश निकम, व दिनेश रमेश मोरे यांनी मार्गदर्शन केले. सदर परीक्षेचे जिल्हा समन्वयक राकेश विसपुते व निलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.




