अमळनेर:- तालुक्यातील बोदर्डे येथील ४७ वर्षीय इसमाने खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना २१ रोजी घडली होती.
याबाबत मंजुळाबाई मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती संतोष हिरामण मिस्तरी यांनी गावातील अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून २० हजार व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. अशी फिर्याद पत्नी मंजुळा बाई मिस्तरीने दिल्याने याप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला गुंन्हा दाखल करण्यात आला होता. भालेराव गोविंदा महाजन आणि अशोक दयाराम चौधरी यांनी अमळनेर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सरकारतर्फे अँड एस. एस. प्रधान यांनी कामकाज पाहीले.तर आरोंपीतर्फे अँड दिनेश पाटील यांनी संयुक्तिक युक्तिवाद करून अमळनेर न्यालयातील वर्ग एक जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी अटी शत्तीवरती जामीन मंजूर केला.