
अमळनेर(प्रतिनिधी):- शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगतातून लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस. सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ,मुख्य लिपिक शाम पवार,ज्येष्ठ शिक्षक के.पी.पाटील,के.आर.बाविस्कर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




