
अमळनेर विजवितारण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील मुडी प्र. डांगरी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.भरवस सबस्टेशन अंतर्गत मूडी, मांडळ, लोण बु, कळंबे, बोदर्डे लोण चारम,लोण खुर्द अशा सात ते आठ गावाचा कारभार अवलंबून आहे. परंतू गेल्या महिन्याभरापासून वीज पुरवठा रात्री बे रात्री सतत चालू बंद करण्यात येत आहे. दररोज दुरूस्ती व तांत्रिक अडचणीच्या आडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळें नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान परिसरातील नागरिकांनी सबस्टेशन ला वेळोवेळी माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.




