
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथे ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह तापी नदीत आढळून आहे. सुटकार ता चोपडा येथील ४५ वर्षीय प्रौढ गावालगत वाहणाऱ्या तापी नदीत अंघोळीला गेला असता पाय घसरून तो वाहत्या प्रवाहात सापडून काल दिनांक ८ रोजी वाहून गेला होता, त्याचा मृतदेह आज दुपारी पाडळसरे येथिल तापीनदीच्या दक्षिण तिरावर नाटेश्वर महादेव मंदिरा शेजारी वाहताना गुराख्यांना दिसून आला, ही माहिती पोलीस पाटील उमाकांत पाटील यांनी पोलिसांना कळविताच हवालदार मुकेश साळुंखे, सुनील तेली, फिरोज बागवान यांनी पट्टीच्या पोहणाऱ्या गोपाल कोळी, चंदा नाईक, राजू कोळी या युवकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला,
सुटकार येथे काल दिनांक 8 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यविधी आटोपून नदीत अंधोळ करून येतो असे सांगून दिनकर बंडू ठाकरे (वय 45) हे घरातील मंडळीला सांगून गेले असता त्यांचे कपडे नदी तिरावर मिळून आले जवळपास शोधाशोध केली तरी ते मिळून आले नाही, शेवटी मामांचे गाव असलेल्या पाडळसरे येथिल गंगाराम कोळी यांना ही गोष्ट कळली असता त्यांनी व नातवाईक यांनी मिळून तापी तिरावरील गावात विचारपूस करीत असताना पाडळसरे येथिल गुरे चारणाऱ्यांना नदी पात्रता कुणीतरी वाहत असल्याची माहिती मिळताच गावात वार्ता पसरली आणि पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळविल्यावर पोहोणाऱ्याच्या मदतीने वाहणाऱ्याला बाहेर काढले असता शव फुगून गेले होते, डॉक्टरांना जागीच बोलवून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला, त्यावर गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले, याबाबत शशिकांत नंदलाल ठाकरे यांच्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे करीत आहेत.




