
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील हुतात्मा स्व. विजय साळुंखे यांना ३१व्या स्मृती दिनानिमित्त मारवड येथे विजय चौकात आदरांजली वाहण्यात आली.
देशाचे रक्षण करताना पंजाब येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत स्व. विजय साहेबराव साळुंखे यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. दि १० रोजी पुणे येथील सीआरपीएफ टीममधील अधिकारी एसआय एस. पी. धुमाळ, एसआय अनिल भोहने, व राहुल निकम यांच्या हस्ते त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम साळुंखे, उपसरपंच भिकन पाटील, सदस्य अनिल पाटील, बी डी पाटील, हरिभाऊ मारवाडकर, डॉ माधवराव पाटील, देविदास साळुंखे, वासुदेव साळुंखे, भाऊराव सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सनेर व सर्व ग्रामस्थ हजर होते. यावेळी सूत्र संचालन एल जे चौधरी यांनी केले.




