
अमळनेर:- रामगिरी महाराजांनी एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन युवक काँग्रेस तर्फे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना देण्यात आले.
गंगागिरी महाराज संस्थान चे रामगिरी महाराजांनी सिन्नर येथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे आपत्तीजनक व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे.यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेस जबाबदार असणाऱ्या महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर अली सय्यद यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, शहराध्यक्ष मनोज पाटील, शहर उपाध्यक्ष असिफ बागवान, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तुषार संदानशिव, काँग्रेसचे कायदेशीर सल्लागार अॅड प्रशांत संदानशिव, रफीक हाजी, फिरोज पठाण, अब्दुल रज्जाक शेख कादर,असीफ शेख, रेयान पठान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




