पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा, 18000 क्यूसेक पाण्यामुळे पुराचा धोका
अमळनेर:-पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून 28274 क्यूसेक विसर्गाने पाण्याचा प्रवाह असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून दि 26/08/2024 रोजी सद्यस्थितीत 18000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला असून पुढील काही तासांत विसर्ग 32000 ते 35000 क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता असून अक्कलपाडा प्रकल्पातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
तरी पांझरा नदी काठच्या गावांतील नागरिकांनी तसेच धुळे शहरातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग व सहाय्यक अभियंता श्रेणी-1, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.