अमळनेर:- तालुक्यातील धार येथील तलावात बारावीतील विद्यार्थ्याचा शुक्रवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला,जयेश दीपक पाटील असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे,जयेश आणि आणखी दोघे जण शुक्रवारी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे समजते दरम्यान सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला
जयेश हा कंडारी गावाचा रहिवाशी होता, त्याने शिक्षणासाठी अयोध्या नगरात रूम केला होता, प्रताप महाविद्यालयात अकरावी केल्या नंतर त्याने बारावी साठी मारवड येथील कनिष्ट महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, प्रताप महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रताप पॅटर्न मध्ये त्याने शिकवणी लावली होती, जयेश हा दीपक भरत पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता,दीपक पाटील हे शेतकरी असून जयेशच्या निधनाची बातमी कळताच वडिलांना अश्रू अनावर झाले जयेश च्या पश्चात आई वडील एक बहीण, आणि आजी आजोबा आहेत. मारवड पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सुनील तेली, पोहेकॉ मुकेश साळुंखे, कुलदीप चव्हाण (रा.अमळनेर), प्रकाश धाप (रा.अमळनेर), इक्बाल शेख (रा.धार), सोपान पाटील (रा.धार) यांनी सदर तरुणाचा मृतदेह तलावातून काढला. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली करीत आहेत.