
अमळनेर:- येथील तालुका क्रीडा संकुलात १० रोजी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता.
शहरातील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले व जिल्हा स्तरावर निवड झाली. यात प्राची खैरनार (थाळी फेक – प्रथम), राशी महाजन (थाळी फेक -द्वितीय व गोळा फेक प्रथम क्रमांक) तसेच 17 वर्षाआतील स्पर्धेत मानसी पाटील (थाळीफेक – द्वितीय , गोळा फेक-प्रथम, हातोडा फेक प्रथम क्रमांक), हर्षाली पाटील (थाळी फेक-प्रथम , गोळा फेक -द्वितीय व हातोडा फेक -तृतीय), अनुष्का पवार (भालाफेक -प्रथम क्रमांक) यांनी स्पर्धेत यश मिळवले. विजयी खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉईस, मॅनेजर मदर डिव्हाईन यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक कमलेश मोरे सर व किरण शिंपी सर यांचे मार्गदर्शन लाभले.




