
अमळनेर-गणेशोत्सव निमित्ताने आज दि 15 रोजी नवव्या दिवशी एकूण लहान मोठ्या 48 मंडळाच्या गणरायाचे विसर्जन मिरवणुका काढून केले जाणार आहे.

गणेश विसर्जन निमित्त शहरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पालिकेतर्फे विविध ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.काल आठव्या दिवशी मंगरूळ येथे शांततेत विसर्जन मिरवणूका पार पडून गणपती बाप्पाला आनंदाने निरोप देण्यात आला.




